लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी मार्फत लहान मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
कोरोना महामारी नंतर लहान मुलांच्या आरोग्याला महत्व देण्यासाठी लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी ने या नवीन लायनेस्टिक वर्षात इचलकरंजी तील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ शोएब मोमीन यांच्या सहकार्याने हेल्दी स्कूल या सेवा कार्याची सुरवात केली आहे. यासेवा कार्याअंतर्गत प्रत्येक महिन्यातुन दोन वेळा शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात येणार आहेत.
उपक्रमाची सुरुवात जवाहर नगर येथील शंकरराव जाधव विद्या मंदिर शाळेतील १९० विध्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणेत आले यावेळी डॉक्टरांनी पावसाळ्यात विध्यार्थ्यांनी काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन करून सर्व मुलांना माहिती पत्रकाचे वाटप केले .
याप्रसंगी लायन क्लब चे अध्यक्ष लायन महेंद्र बालर यांनी कोरोना नंतर मुलांचे आरोग्य व स्वच्छता विषयी मार्गदर्शन केले .मुख्याध्यापिका सौ गीता पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले, यावेळी सेक्रेटरी लायन सुभाष तोष्णीवाल, खजिनदार संदीप सुतार , कमिटी चेअरमन लायन नंदकुमार बांगड, लायन सचिन येलाजा, लायन कांता बालर, लायन रेणू बांगड, सचिन वारे सर शाळेतील शिक्षक वर्ग पालक व लायन सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, वरील उपक्रमाचे पालक वर्गातुन लायन्स क्लब चे कौतुक होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा