माणकापूर येथे विजेचा धक्का बसून विवाहितेचा मृत्यू
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
माणकापूर तालुका निपाणी येथे विहिरीवरील विद्युत मोटर सुरू करीत असताना पेटी मध्ये विजेचा धक्का बसून सौ. अर्चना गजानन उर्फ पिंटू वलशेट्टी (वय वर्ष ३५) या विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की इचलकरंजी रस्त्यावर असलेल्या पाटील मळ्यात गजानन वलशेट्टी कुटुंबीय वास्तव्यास आहेत. सकाळची लाईट असल्याने घरामध्ये पिण्याचे पाणी भरण्यासाठी विहिरीवरील विद्युत मोटर सुरू करण्यासाठी अर्चना गेल्या होत्या .पेटी उघडत असताना पेटीत पावसाने विद्युत प्रवाह संचारल्याने त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला आणि त्या जागीच मृत्यूमुखी पडल्या. बराच उशिरा अर्चना वलशेट्टी घराकडे परत आल्या नसल्याने नातेवाईक विहिरीवर पाहणी करण्यासाठी गेले असता त्या पेटीच्या बाजूलाच पडल्या होत्या. त्यावेळी नातेवाईकानी आरडाओरडा करून इतर नागरीक जमवून तात्काळ त्यांना इचलकरंजीच्या सरकारी दवाखान्यात दाखला केले पण त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले .
दुपारी मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात एक मुलगा ,एक मुलगी, पती,असा परिवार आहे. या घटनेने माणकापुरात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा