सदलगा : पाणी पातळीत झपाट्याने वाढ; जुना पूल पाण्याखाली
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
काळमवाडी पांनलोटक्षेत्रात गेली तीन दिवस पावसाने हजेरी लावल्याने दूध गंगा नदीचे पाणी पातळी झपाट्याने वाढले आहे या परिसरात दमदार पाऊसाने हजेरी लावल्याने पाणी पातळी पाच फूट वाढल्याने पाणी पात्राबाहेर पडले आहे पहिल्यांदाच जुना पूल पाण्याखाली गेला आहे.
दूधगंगा नदी काठातीवरील अनेक पिकात पाणी आल्याने पिके पाण्याखाली गेले आहेत. शेतकरी पाण्याच्या विद्युत मोटरी व जनावर स्थलांतर करण्यात एकच धांदल सुरू आहे. गेल्या वर्षीच्या महापुरेच्या धास्तीने नदी काठावरील शेतकरी आपल्या विद्युत मोटरी व आपले जनावरासह स्थलांतर होण्याचे धांदल सुरू आहे तर काही विद्युत मोटरीना जलसमाधी मिळाली आहे पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने महापुराच्या धास्तीने आतापासूनच नदीकाठचे शेतकरी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर हा पाऊस वडगोल नेज, नणदी, नागरळ, शिरगाव, हिरेकुडी या माळभागातील ऊस भाजीपाला व इतर पिकांना उपयुक्त ठरणार आहे या भागातील शेतकरी वर्ग सुखावला आहे गेल्या तीन दिवसांनी पुनर्वसु नक्षत्राने दमदार हजेरी लावल्याने गेल्या 24 तासात दूध गंगानदीचे पाण्याची पातळी वाढल्याने पहिल्यांदाच पाणी पा त्रा बाहेर पडले आहे 24 तासात पडलेली पावसाची नोंद८.४ मी .मी. तर पाणी पातळी.पाच फुटांनी वाढले आहे पाण्याची पातळी 532.380 तर विसर्ग 10568 ने सुरू आहे. दूधगंगा नदीला पाणी आल्याने मासे पकडण्यासाठी मासे शौकिनाची एकच गर्दी करत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा