कौन बनेगा करोडपती शो मध्ये अकिवाट येथील शशांक चोथे यांचा सहभाग
नामदेव निर्मळे / शिवार न्यूज नेटवर्क :
अकिवाट तालुका शिरोळ, जिल्हा:- कोल्हापूर येथील शशांक चौथे हे खेडेगावातून पोहोचले कोण बनेगा करोडपती मध्ये महानायक अमिताभ बच्चन होस्ट करीत असलेल्या कौन बनेगा करोडपती सिझन 14 च्या शो मध्ये शशांक रामचंद्र चोथे सहभागी होत आहेत. शशांक चोथे हे अलिकडेच उरुण इस्लामपूर येथे शिक्षक म्हणून रुजू झाले आहेत. तसेच गेली कित्येक वर्षे ते खिद्रापूर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे आणि पर्यटन विकासासाठी कार्य करीत आहेत. विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूरचे माजी विद्यार्थी असून त्यांनी महाविद्यालयाचे जीएस हे पद भूषविले होते. 15 आॅगस्ट पासून सोनी टीव्हीवर प्रसारित होत असलेल्या आझादी का अमृत महोत्सव स्पेशल वीक मध्ये शशांक चोथे यांची अंतिम 10 कंटेस्टंट मध्ये निवड झाली. सोमवार 15 आॅगस्ट पासून सुरू होत असलेल्या आठवड्यामध्ये ते फास्टेस्ट फिंगर फर्स्ट ट्रिपल टेस्ट खेळताना दिसतील.
देशभरातून लाखो स्पर्धक सहभागी होत असलेल्या या केबीसी शो साठी विविध पातळीवर अनेक चाचण्यांमधून सात राऊंड नंतर अंतिम फेरीकरिता निवड होत असते. कित्येक वर्षांच्या प्रयत्नानंतर देखील अंतिम फेरीकरिता निवड होईलच याची शाश्वती नसते. शशांक चोथे यांनी सांगितले की पहिल्या सिझन पासून अनेक वर्षे ते प्रयत्न करत होते. अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर यावर्षी त्यांची अंतिम शो साठी निवड झाली.
त्यांच्यासोबत साथीदार म्हणून सौ. शरयू चोथे सहभागी झाल्या होत्या. तसेच विशेष गेस्ट म्हणून त्यांचे वडील डॉ. रामचंद्र चोथे सहभागी झाले होते. डॉ. रामचंद्र चोथे यांचेकडे अमिताभ बच्चन यांचे वडील ख्यातनाम हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध मधुशाला या काव्याच्या मराठी अनुवादाबाबत 1976 साली लिहिलेले पत्र आहे. हे पत्र चोथे कुटुंबीयांनी अमिताभजी यांना दाखवल्यानंतर ते भावूक झाले. हरिवंशराय बच्चन यांच्या मूळ पत्रावरती अमिताभ बच्चन यांनीदेखील स्वाक्षरी केली. केबीसी च्या माध्यमातून लाभलेला अमिताभ बच्चन यांचा सहवास अत्यंत सुखद असल्याचे चोथे कुटुंबीयांनी आवर्जुन सांगितले. शुटिंग पूर्ण झाले असून सोमवार 15 आॅगस्ट पासूनचा आठवडा प्रसारण होणार आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा