हेरवाड मध्ये बाळूमामांच्या रथाचे उत्साहात स्वागत

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे महान संत श्री बाळूमामा यांचे रथ व मेंढरांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील प्रमुख मार्गावरुन रथाची मिरवणूक काढण्यात आली. या रथाचे प्रत्येक चौकात रांगोळी काढून मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी स्वागत केले.

महाराष्ट्रतील महान योगी संत म्हणून बाळूमामा यांच्याकडे पाहिले जाते. धनगर समाजाचे दैवत, अशी त्यांची ख्याती आहे. ज्या ठिकाणी बाळूमामा यांची मेंढरे जातात ती जागा रोग मुक्त आणि पवित्र होते अशी भक्तांची श्रध्दा आहे. हेरवाड परिसरात बाळूमामा यांची मेंढरे येताच तिथल्या नागरिकांनी त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या.

 बोललेला नवस बाळूमामाची मेंढरे पुर्ण करतात, संकटे देखील दुर होतात अशी आस्था, असा विश्वास नागरिकांना असल्याने त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. 

बाळूमामांची मेंढरे हेरवाड मध्ये तिन दिवस असणार आहेत, यानिमित्त माळ भागावरील ग्रामदैवत श्री संतुबाई देवीच्या मंदिरात दररोज सकाळी व सायंकाळी आरती, धनगरी ओव्या, भजन, किर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यावेळी गावातील नागरीकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष