हेरवाड मध्ये मंगळवारी होणार करबल दंगल
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क
शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे हिंदू मुस्लिम करबल कमिटीच्या वतीने भव्य करबल दंगल आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मंगळवार दिनांक ३० रोजी रात्री नऊ वाजता ग्रामपंचायत पटांगणावर होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य सुकुमार पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. या स्पर्धेसाठी अनुक्रमे ११ हजार १, ५ हजार १, ४ हजार १, ३ हजार १, २ हजार १, १ हजार १ अशी बक्षीसे तसेच शिल्ड देण्यात येणार आहेत. उद्घाटन प्रसंगी सरपंच सुरगोंडा पाटील, दिलीप पाटील, वसंतराव देसाई, दामोदर सुतार, हुसेन जमादार, बाळासो माळी, सुवर्णा अपराज, रेखा जाधव, बाबुराव माळी, प्रशांत चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा