नांदणी : वेश्या व्यवसायावर शिरोळ पोलिसांची कारवाई


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

नांदणी तालुका शिरोळ हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे वेश्या व्यवसायचालवणाऱ्या दोन महिलांच्यावर शिरोळ पोलिसांनी कारवाई करून दोन पिडित महिलांची सुटका केली आहे. या कारवाईमध्ये तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

 याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की, नांदणी तालुका शिरोळ हद्दीत असणाऱ्या रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे मुस्कान उर्फ बिस्मिल्ला मुबारक शेख वय 50 व इंदुमती महावीर आरबाळे वय 50 यांनी एकमेकांच्या संगनमताने रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे चिपरी फाट्या नजिक वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीवरून पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई करून या दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पंधरा हजार रुपये रोख रक्कमेसह तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दोन पिडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे करित आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष