लोककलाकार उषा हंकारे यांचे निधन

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रात कलापथकाच्या रंगमंचावर लावणी साम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या उदगाव (ता शिरोळ) येथील उषा कुबेर हंकारे (वय वर्षे 57) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांच्या पश्चात पती , दोन मुले असा परिवार असून हंकारे परिवाराने कलापथक, नाट्य ,चित्रपट क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे ,कोल्हापूर येथील हंकारे ऑर्केस्ट्रा कलापथकाचे निर्माते व प्रसिद्ध लोककलाकार कुबेर हंकारे यांच्या त्या पत्नी होत.

      उषा हंकारे यांनी आयुष्याच्या प्रवासात प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत लोककलाकार म्हणून कला क्षेत्रात मोठे योगदान दिले, लोककलाकार, ऑर्केस्ट्रा , लावणी शो ते सिने अभिनेत्री असा प्रदीर्घ प्रवास त्यांनी केला, तालुक्यातील उदगाव गावच्या त्या सुनबाई होत्या, माळावरच फुल, ठिणगी, माहेरची पाहुणी , लेक चालली सासरला या चित्रपटात त्यांची विशेष भूमिका असून कलाकारांच्या जीवनावर आधारित 'कुबेर' मराठी चित्रपटाच्या निर्मात्या होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष