हेरवाड मध्ये गणरायाचे उत्साहात स्वागत


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क

ढोलताशांचा गजर, टाळ्यांचा नाद आणि मोरया... मोरयाच्या गजरात हेरवाडमध्ये आज सकाळपासूनच उत्साही वातावरणात श्री गणेशाचे आगमन झाले. भाविकांना प्रतीक्षा असलेला लाडक्या गणरायाचे आज घरोघरी वाजत गाजत आगमन झात्यामुळे या चैतन्यपर्वामुळे भाविकांमध्ये उत्साहात निर्माण झाला होता.

मागील दोन वर्ष कोरोना काळ असल्याने गणपती बाप्पाचं आगमन झालं, मात्र फारसा उत्साह नव्हता. यंदा मात्र कोरोनाचे मळभ दूर झाल्याने भाविकांनी जोरदार उत्साहात धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. दरम्यान आठवडाभरापासूनच गणेश मूर्ती सजावट व पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत होती. दरम्यान आज सकाळपासूनच गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत ढोल ताशांच्या गजरात भाविकांनी गणेश मूर्तीची खरेदी करत गणेशाचे घरोघरी आगमन तसेच मंडळांचे आगमन मोठ्या उत्साहात झाले, दरम्यान आज रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे गणेशभक्तांची निराशा झाली.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष