सन्मती शाळेत गणवेश, शैक्षणिक साहित्य वाटप
इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी ही संस्था सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते याचाच एक भाग म्हणून जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ इचलकरंजी संचलित सन्मती बौधिक अक्षम मुलांची शाळा व कार्यशाळा येथील विद्यार्थ्यांना लायन्स क्लबने आर के कॉलनी कीटी ग्रुप ,शांतीदेवी जसराजजी बालर , शांताजी अशोक सालेचा ,जमनालालजी काबरा, कमलादेवी गौतमचंद बालर याच्या सहकार्याने ६ विद्यार्थ्याना दतक घेऊन सामाजिक बांधिलकीचा नवीन पायंडा लायन्स क्लब ने पाडला ,रक्षाबंधन निमित्ताने सौ. कांता बालर, सौ ललिता जोशी, सौ महादेवी किन्तुरे, सौ शुभांगी पाटील या लायन भगिनीनी मुलांना औक्षण करून मुलांना राख्या बांधून शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी श्री सत्यनारायण भराडीया व कैलास जोशी यांच्या सहकार्याने महेंद्र बालर यांचे हस्ते गणवेश व खाऊ वाटप करण्यात आले . यावेळी इचलकरंजीचे अध्यक्ष लायन महेंद्रजी बालर शाळेसाठी कायम सहकार्य करण्याचे आस्वासन दिले.
उपस्थितांचे स्वागत व परिचय श्री सुकुमार पोते यांनी केले. तर प्रास्तविक श्री सुभाष काडाप्पा यांनी केले. सुञसंचलन व आभार श्री संजय कुभार यांनी मानले.
या कार्यक्रमास सेक्रेटरी सुभाष तोष्णीवाल, ला लक्ष्मीकांत भट्टड लिंगराज कित्तुरे, किशोर पाटील डॉ. ए.के. चौगुले, श्री रविंद्र पाटील श्री सी डी.डी लडगे, सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा