अपूर्वा साठी एक हात मदतीचा : आजी-माजी सैनिकांनी केली २० हजाराची मदत
इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील आजी-माजी सैनिकाकडून २० हजाराची रोख रक्कम अपूर्वा शिरढोणे या बालिकेच्या उपचारासाठी दत्तवाड येथील समितीकडे सुपूर्त करण्यात आली. दत्तवाड येथील अपूर्वा शिरढोणे या बालिकेला भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. तिच्यावर सांगली येथे सध्या उपचार सुरू आहेत. घरची परिस्थिती बेताची आणि आईना पोरक झालेल्या मुलीला आर्थिक मदतीचा हातभार मिळणं फार गरजेचे आहे. असे आवाहान समाजात करण्यात आलं होतं. या आव्हानाला साथ देत सैनिक टाकळी तालुक शिरोळ येथील समाज उपयोगी कार्य करणारे सध्या सैन्यात असणारे सैनिक व सैन्यातून निवृत्त झालेली सैनिक अशा आजी-माजी सैनिकांनी काढलेला ग्रुप जो नेहमी रंजल्या गांजल्याकरिता नेहमी अग्रभागी काम करतो. त्या 'आर्मी वॉरियर्स' या ग्रुपमधील सदस्यांच्या कडून या बालिकेसाठी एक हात मदतीचा म्हणून २० हजाराची मदत दत्तवाड येथील समितीकडे सुपूर्त करण्यात आली.
यावेळी सैनिक टाकळी येथील माजी सैनिक बबन पाटील, सुहास जाधव, अनिल बाबर, संजय पाटील, केदार पाटील, प्रवीण पाटील, ग्रा.पं. सदस्य संजय पाटील, माजी उपसरपंच राजगोंडा पाटील, सामाजिक कार्यकर्ते कुमार पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा