गणेश मंडळांनी ईलेक्ट्रिक डेकोरेशन पावसात भिजून कोणतीही दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी : सपोनि बालाजी भांगे

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क

कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पावसामुळे लायटिंग ,तसेच ईलेक्ट्रिक डेकोरेशन पावसात भिजून कोणतीही दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच प्रशासनाच्या घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी केले आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, यावर्षी गणपती बाप्पांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच मंडळांनी मोठी जय्यत तयारी केली आहे, मात्र सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लायटिंग ,तसेच ईलेक्ट्रिक डेकोरेशन पावसात भिजून कोणतीही दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच प्रशासनाच्या घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, आपल्या गणेश मुर्ती व ईलेक्ट्रिक साहीत्य भिजणार नाही व दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष