शिरोळमध्ये गुटख्यावर मोठी कारवाई ; १४ लाखाचा मुद्देमाल जप्त

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ - नृसिंहवाडी मार्गावर वाहतूक होत असलेल्या बोलेरो पिकअप मधील गुटखा शिरोळ पोलिसांनी जप्त करून सुमारे १४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी तिघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शिरोळ - नृसिंहवाडी मार्गावर असलेल्या दर्शन हॉटेल समोर करण्यात आली. 

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की, शिरोळ - नृसिंहवाडी मार्गावरून गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती सर्व पोलिसांना मिळाली होती या माहितीवरून पोलिसांनी बोलेरो पिकअप ही गाडी थांबवून गाडीतील सुमारे ७ लाख ५ हजार ६०० रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा तसेच सुमारे ५ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप असा दोन्ही मिळून १३ लाख ९३ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी अमर पाशा मिअर शेख (वय २८ ) व रफीक महंमद शेख ( वय : ३२) तसेच बंटी ( पूर्ण नाव समजू शकले नाही ) या तिघांच्या विरोधात शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप यांनी फिर्याद दिली आहे.

सदरची कारवाई सदरची कारवाई पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोरिगिद्दे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, विश्वास कुरणे,पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर सानप, ताहीर मुल्ला, कडूबा जाधव या पथकाने केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष