गुरूंच्या आई वडिलांच्या हस्ते झाले अमृत महोत्सवी ध्वजारोहण 🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात सर्वत्र उत्साहात संपन्न होत आहे.आज स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजीअहिल्याबाई होळकर विद्यामंदिर क्रमांक 30 या शाळेतील शिक्षक श्री विजय काळे सर यांच्या आई वडिलांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
यावर्षी ध्वजारोहणाचा सन्मान शाळेतील मुख्याध्यापकांचा असूनही मुख्याध्यापक श्री रणजीत पाटील सर यांनी आपल्या शाळेतील शिक्षक श्री. विजय काळे सर यांचे वडील श्री.अर्जुन परशराम काळे वय- 75 वर्षे व आई सौ.लक्ष्मीअर्जुन काळे वय -70 वर्षे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले.
नगरपालिका शाळांच्या इतिहासात शिक्षकांच्या आई वडिलांच्या हस्ते ध्वजारोहण होणे. ही एक सुखद घटना आहे. याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री.रणजीत पाटील सर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.*
याप्रसंगी या भागातील माजी नगरसेविका सौ.शुभांगी प्रधान माळी,सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रधान माळी,श्री. मारुती नाईक,श्री.आप्पासो नाईक,श्री.सचिन मासये,श्री. फारुख सय्यद,श्री.हर्षल जमादार,श्री.विक्रम खोत,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ.नजराना गाझी, सौ. समीना शेख ,सर्व शा.व्य.समिती सदस्य अंगणवाडी सेविका सौ शिंगाडे सौ.हळ्ळी, सौ.फुले त्याचबरोबर शाळा क्रमांक तीनच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा आवळे मॅडम, सौ.नाहिदकौसर समडोळे,श्री. मतीन शेख,सौ.फैरोजा शेख,सर्व पालक,विजय काळे सर यांचे कुटुंबातील सर्व सदस्य, माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत श्री.संभाजी कदम सर तर प्रास्ताविक मुख्याध्यापक- श्री. रणजीत पाटील सर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सौ. गीता सोलगे मॅडम यांनी करून दिला.कार्यक्रमाचे आभार श्री. प्रकाश केंगार सर यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन सौ. सुधाताई पाटील, सौ.सुरेखा बिराजदार मँडम यांनी केले.*

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा