ऑल इंडिया फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स मुंबई या संस्थेच्या अध्यक्षपदी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची फेरनिवड
शिवार न्यूज नेटवर्क :
देशभरातील सहकारी सूतगिरण्या व वस्त्रोद्योग क्षेत्रातील सहकारी तत्त्वावरील अनेक संस्थांचे नेतृत्व करणाऱ्या ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कॉपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स मुंबई या संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध संपन्न झाली नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची बिनविरोध निवड संपन्न झाली, या संस्थेवर अनेक वर्षे सहकारमहर्षी स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांचे वर्चस्व होते, संस्थेच्या उपाध्यक्षपदी कर्नाटक स्टेट को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स फेडरेशनचे चेअरमन एस. एस. दोडमणी यांची निवड झाली, अध्यक्षपदी निवडणूक निर्णय अधिकारी ऍडव्होकेट ए.जी
पंडीत होते, निवडीनंतर बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले सहकारी सूतगिरण्यां समोरील अडचणी पाहता यातून मार्ग काढण्यासाठी आपण राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून यापुढेही सर्वांना सोबत घेऊन काम करत राहू व अडचणीत असलेल्या सहकारी तत्त्वावरील सूतगिरण्यांना पुन्हा ऊर्जित अवस्था कशी येईल यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले, अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल त्यांनी सर्व संचालकांच्या प्रति आभार व्यक्त केले सभेस नवनिर्वाचित संचालक अजित चालुक्य कार्यकारी संचालक सागरेश्वर सहकारी सूतगिरणी सांगली, तुलसीगिरीयप्पा सोमवेदी संचालक फार्मर्स को-ऑपरेटिव स्पिनिंग मिल्स, गदग कर्नाटक, रवींद्रनाथ मुलीमणी संचालक गदग को-ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स हुलकोरी कर्नाटक, संजय पाटील- यड्रावकर चेअरमन कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी लिमिटेड, यड्राव इचलकरंजी, प्रकाश पाटील टाकवडेकर चेअरमन राजर्षी शाहू यंत्रमाग सहकारी संस्था लिमिटेड टाकवडे यांच्यासह कार्यकारी संचालक एस. जे. सिक्वेरा यांच्यासह आण्णाभाऊ साठे आजरा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन अशोक चराटी, सागरेश्वर सहकारी सूतगिरणी सांगलीचे जनरल मॅनेजर अरुण दिवटे, सागरेश्वर मागासवर्गीय यंत्रमाग संस्थेचे चेअरमन महेश कदम, महाराष्ट्र वस्त्रोद्योग महासंघाचे कार्यकारी संचालक रामचंद्र मराठे, राईतारा सहकारी सूतगिरणी लिमिटेड हावेरी चे संचालक बसप्पा शिदगनील, शेतकरी सहकारी टेक्स्टाईल लिमिटेड यड्राव चे चेअरमन अजित उपाध्ये आणि मान्यवर उपस्थित होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा