शिरोळ पंचायत समितीचे माजी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी -राजाराम काळगे यांचे दुःखद निधन
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क
शिक्षण क्षेत्रातील एक खळखळते हसरे व्यक्तिमत्व अब्दुललाट नगरीचे सुपुत्र,शिरोळ पंचायत समितीचे सेवानिवृत ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री.राजाराम दत्तात्रय काळगे यांचे वयाच्या 58 व्या वर्षी हृद्यविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले.
गेल्याच महिन्यात 31 जुलै 2022 रोजी 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले होते.अतिशय खडतर व हलाखीच्या परिस्थितीमधून शासकीय सेवेत प्रवेश केला होता.सांगली व कोल्हापूर जिल्हयात आपल्या कार्याचा ठसा उमटविलेला होता. धीरगंभीर प्रश्नांवर अगदी हसत खेळत चुटकीसरशी मार्ग काढण्यात त्यांचा हातखंडा होता.एखादया शाळेत भेटीसाठी गेल्यावर मुलांच्या बरोबर नाचत कविता,बडबडगीते स्वतः गात रममाण व्हायचे. नेहमी हसरा चेहऱ्याने सर्वांशी आपुलकीने वागणारे काळगे साहेब शिक्षणक्षेत्रात चिरंतन स्मरणात राहतील. अशा भावना समस्त शिक्षण वर्गातून भावना व्यक्त होत आहेत. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा