3100 रुपये दर देणाऱ्या पंचगंगा कारखान्याचे चेअरमन व एम. डी. यांचा आंदोलन अंकुश कडून सत्कार


सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

भागातील कारखाने 2900 रुपये दर जाहीर करून सुरु झाले असले तरी हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नसल्यामुळे शेतकरी सध्या या कारखान्यांना ऊस देण्याच्या मनस्थितीत नाही.

याउलट 3050 रुपये दर जाहीर करून पंचगंगा कारखाना सुरु झाला होता तो दरही मान्य नाही म्हणून आंदोलन अंकुश ने पंचगंगा कारखान्याची वाहतूक रोखली होती.त्यावेळी व्हाईस चेअरमन श्री जयपाल कुंभोजे यांनी मध्यस्ती करून 3100 रुपये दर जाहीर करू असे सांगून वाहने सोडण्यास सांगितली होती तो शब्द त्यांनी पाळून 3100 रुपये दर जाहीर केला म्हणून आज कारखान्यावर चेअरमन पी एम पाटील व्हाईस चेअरमन जयपाल कुंभोजे, एम. डी. व शेती अधिकारी यांचा सत्कार केला.

आपण चालूला 3100 केला असला तरी रिकव्हरी नुसार दुसरा हप्ता व मागील हंगामाचा दुसरा हप्ता द्यावा अशी आग्रही मागणी आंदोलन अंकुश च्या वतीने करण्यात आली. भागातील अन्य साखर कारखान्यांनी जाहीर केलेला दर वाढवून नव्याने घोषणा करावी अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा धनाजी चुडमुंगे यांच्याकडून देण्यात आला. यावेळी आंदोलन अंकुश चे राकेश जगदाळे दिपक पाटील अक्षय पाटील भूषण गंगावणे सदाशिव निंबाळकर एकनाथ माने आण्णासो वडगावे बंडू होगले प्रमोद बाबर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष