बोरगांव येथील यंत्रमाग कामगार बेपत्ता
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव ता निपाणी नगर पंचायत हदीतील आर के नगर येथील जाकीर सिकंदर मकानदर (वय:43) हे बेपत्ता झाल्याची फिर्याद पत्नी जयबून मकानदार यांनी सदलगा पोलीस ठाण्यात केली आहे.
जाकीर मकानदार हा 8 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी सहा वाजता केस कापण्यासाठी जाऊन येतो असे सांगून घरातून निघून गेल्याने ते आज पर्यंत घरी परत आले नाहीत. नातेवाईक व इतरत्र शोधा शोध केली पण ते मिळून आले नाहीत. झाकीर हा एका पायाने अपंग असून रंग सावळा आहे .पाच फूट उंची असलेल्या झाकीर याला मराठी , कन्नड ,हिंदी अशा तीन भाषा अवगत आहेत तो यंत्र माग कामगार आहे,. सदर व्यक्ती तीन दिवसापासून घरातून बेपत्ता झाले आहेत.या व्यक्तिबाबत कोणाला माहिती झाल्यास सदलगा पोलीस ठाणे किंवा मुलगा रमजान मकानदार यांच्या 9071919811 या मोबाइल नंबरशी संपर्क करण्याचे आवाहन नातेवाईक कडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा