शिरोळ मधील उरुसाला उत्साहत सुरुवात

 


सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : 

हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या येथील ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सवानिमित्त  सोमवारी सकाळी मंदिरामध्येम हापूजा व महाअभिषेक सोहळा संपन्न झाला. त्याचबरोबररा रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पारंपरिक मानकरी व भाविकांच्या उपस्थितीत  गंधरात्र सोहळा पार पडला.

     दरम्यान, आज मंगळवारी श्री बुवाफन महाराज उत्सवाचा मुख्य दिवस  आहे, त्यानंतर बुधवारपासून हजरत नूरखान बादशहा उरसास प्रारंभ होणार आहे, उत्सव व उरसानिमित्त 20 नोव्हेंबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

          सोमवारी सकाळी श्री बुवाफन महाराज (श्री बावसिद्ध स्वामी समाधी) मंदिरात सकाळी सव्वानऊ वाजता श्रींची महापूजा व महाअभिषेक करण्यात आला, यावेळी अशोक हिरेमठ स्वामी , महातय्या हिरेमठ स्वामी, अमोल हिरेमठ स्वामी महाराज यांच्यासह श्री वीरशैव लिंगायत , माळी समाज व भक्तगण उपस्थित होते,  त्याचबरोबर  रात्री श्री बुवाफन महाराज यांच्या समाधीला गंध लावणे व मानाचा गलेफ घालने हा कार्यक्रम  झाला,  या कार्यक्रमास समस्त श्री वीरशैव लिंगायत माळी समाज , त्याचबरोबर  प्रमुख मानकरी व श्री हिरेमठ स्वामी महाराज यांच्या उपस्थितीत हा गंधरात्र सोहळा साजरा झाला, यावेळी बुवाफन महाराज की जय,,,,,असा जयघोष करीत।भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले, यावेळी दर्शनासाठी मंदिरात गर्दी झाली होती.

      दरम्यान, मंगळवारी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने  उरूस समितीने भाविकांना सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी  विशेष नियोजन केले आहे, येथील अजिंक्यतारा मंडळाच्या उरुस समितीचे अध्यक्ष तुषार पाटील यांच्यासह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष