सरपंच पदासाठी विरोधी गटाडून तिन नांवे चर्चेत ; सत्ताधाऱ्यांकडून कमालीची गुप्तता
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील हालचाली गतिमान झाल्या असून सरपंच पदासह सदस्य पदासाठी अनेकांची नावे चर्चेत येत आहेत. प्रामुख्याने दिलीप पाटील यांच्या गटाकडून एडवोकेट अनिरुद्ध कांबळे यांच्या पत्नी सौ. सुजाता कांबळे, सौ.रेखा अर्जुन जाधव व सौ. सुषमा जितेंद्र माने यांची नावे समोर येत आहेत तर आर.बी. पाटील यांच्या गटाकडून उद्याप कोणत्याही उमेदवाराची चर्चा नसल्याने या गटाने कमालीची गुप्तता पाळली असल्याचे दिसते.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली. यामध्ये हेरवाड ग्रामविकास आघाडी आणि राजर्षि शाहू ग्रामविकास आघाडी या बलाढय पॅनेलची लढत रंगतदार झाली होती. आणि यामध्ये राजर्षि शाहू ग्रामविकास आघाडीला जनतेने कौल दिला होता. यावर्षीही आघाडींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तरी देखील आर.बी. पाटील गट आणि दिलीप पाटील गट या दोन मोठ्या गटात ग्रामपंचायतीची निवडणूक रंगणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
या नविन आघाडींची चर्चा..!
गांवचा सर्वांगिण विकास साधण्याच्या हेतूने युवा वर्गाला संधी देण्यासाठी गावातील क्रांती ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी पॅनेल बनविण्याची हालचाल सुरु केली आहे. इतकेच नव्हे तर गावातील शिंदे गटाचे पॅनेल संपूर्ण ताकदीने लढविणार असल्याची माहिती भोला शिंदे यांनी दिली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील यांनीही ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहिर केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा