नवे पर्व - युवा सर्व : प्रभाग २ मधून श्री इटाज पुजारी यांची अपक्ष उमेदवारी जाहीर



हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड गावची सत्ता युवकांच्या हातात दिल्यास नक्कीच गावचा विकास साधता येईल या हेतूने नवे पर्व युवा सर्व या टॅगलाईन खाली गावातील अनेक तरुण युवक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. यापैकीच एक प्रभाग क्रमांक दोन मधून श्री इटाज पुजारी यांची अपक्ष उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

गावात ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आघाड्यांनी उमेदवार निवडण्यास सुरुवात केली आहे. सध्या गावात युवा वर्ग निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. तरुणांच्या हातात गांवची सत्ता आल्यास नक्कीच हेरवाडचा कायापालट होईल असे मत युवकांचे आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात इच्छूक तरुण दिसून येत आहेत. प्रभाग क्रमांक दोन मधून श्री इटाज पुजारी यांची अपक्ष उमेदवारी जाहीर करण्यात आली असून याला जनने तून पाठींबा मिळत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष