हेरवाडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कोणती भूमिका घेणार ?
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष, गटतट कामाला लागले असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र गावात सुमारे ५०० ते ६०० एकनिष्ठ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक कोणती भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
१८ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर गावातील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, यड्रावकर गट, मनसे या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावात हालचाली गतिमान केल्या आहेत. व विविध आघाड्याअंतर्गत चर्चा सुरू आहे.
मात्र, एकनिष्ठ असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गावात ५०० ते ६०० कार्यकर्ते आहेत. त्यांची भूमिका काय असणार ? स्वतःचे पॅनल लावणार की कोणाबरोबर युती करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा