हेरवाड : 'ते' नाराज पदाधिकारी सत्ताधारी आणि विरोधी गटात दाखल ; काही पदाधिकारी तटस्त
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्र्वभूमीवर सत्ताधारी गटातील काही पदाधिकारी विरोधी गटाच्या गोटात तर विरोधी गटातील काही पदाधिकारी सत्ताधाऱ्यांच्या गोटात सामील झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नाराज कार्यकर्ते सोडून गेल्यामुळे दोन्ही गटाला सौम्य धक्का बसला आहे.
सत्ताधारी गटातील सुधीर माळी, सुनिल माळी, देवगोंडा आलासे, पायगोंडा आलासे हे पदाधिकारी विरोधी म्हणजे दिलीप पाटील गटात सामील झाल्याची माहिती सुधीर माळी यांनी दिली. तर विरोधी गटातील किंगमेकर व विरोधी पक्षनेते सुकुमार पाटील, भोला शिंदे व रवी इंगळे हे थेट सत्ताधारी गटात सामील झाले आहेत. तसेच आणखीन काही पदधिकारी जाणार असल्याचे समजते.तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबुराव माळी यांनी तटस्ताची भूमिका घेतली आहे. तर इतर दोन्ही गटातील आणखी काही नाराज तयार कार्यकर्ते झाले असून त्यांनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नाही.
या नाराज गटातील पदाधिकारी या ना त्या गटात दाखल झाल्याने सत्ताधारी आणि विरोधकांना सौम्य धक्का बसला आहे. त्यामुळे ही निवडणूक मोठी रंगतदार होणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा