किंगमेकर एकता ग्रुपची भूमिका ठरणार महत्वाची
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मागील पंचवार्षिक निवडणूकीमध्ये किंगमेकरची भूमिका साकारणाऱ्या एकता ग्रुपच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
एकता ग्रुप हा गावातील मोठा ग्रुप समजला जातो. मागील पंचवार्षिक निवडणूकीत एकता ग्रुपने सत्ताधारी गटाबरोबर राहून प्रभाग १ व २ मधून दोन उमेदवार निवडून आणले होते. इतकेच नव्हे तर उपसरपंच पदाची संधीही त्यांना देण्यात आली होती.
त्यामुळे या मंडळाला या पंचवार्षिक निवडणूकीत मोठे महत्व प्राप्त झाले आहे. या निवडणूकीत हे मंडळ कोणती भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सध्या गावात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वसंतराव देसाई हे दिलीप पाटील पाटील यांच्या गटाशी युती केल्याने ही निवडणूक दुरंगी होण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी आर.बी. पाटील गटानेही अंतर्गत व्यूव्हरचना आखली असल्याचे समजते. मात्र गावात एक मोठा समजला जाणारा एकता ग्रुप कोणत्या आघाडीकडे जाईल, त्या आघाडीचेच वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा