कुरुंदवाड मध्ये शतकोत्तर श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड येथील चिलखी विभागातील दत्त मंदिरला 100 वर्ष पूर्ण झाल्याने येथील दत्त मंदिरच्या वतीने यंदा शतकमहोत्सवी श्री दत्त जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती शतकमहोत्सवी सोहळा समितीच्यावतीने देण्यात आली.कुरुंदवाड येथील चिलखी विभागातील श्री. दत्त जयंती शतकमहोत्सवी सोहळ्यानिमित्त दररोज सकाळी सहा वाजता आरती व पूजा, सकाळी सात वाजता गुरुचरित्र पारायण ह.भ.प. दीपक धनाने यांचे मार्गदर्शन, दुपारी बारा वाजता आरती व नैवेद्य. मंगळवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता ध्वजारोहण, कलश पूजन, दीप प्रज्वलन, ग्रंथ पूजन मा. दिगंबर शंकर पुजारी यांच्या शुभहस्ते व सदाशिव रामचंद्र जेरे पुजारी, संजय नारायण पुजारी, विनायक साळुंखे व राजू फल्ले यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुपारी बारा वाजता परमात्माराज महाराज आडी यांचे प्रवचन, सायंकाळी चार वाजता गुरुमाऊली भजनी मंडळ यांचे भजन, सायंकाळी सहा वाजता ह.भ.प. डॉ. जी.आर. पालकर यांचे प्रवचन, रात्री नऊ वाजता ह.भ. प. प्रथमेश इंदुलकर यांचे प्रवचन, बुधवार 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीमती क्षमाताई आरगे यांचे प्रवचन, सायंकाळी सहा वाजता अनिल वाडेकर यांचे भक्ती संगीत, रात्री नऊ वाजता ह.भ.प. श्री. किशोर भाट यांचे कीर्तनसाथ संगीत, गुरुवारी एक डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता विष्णू सहस्त्रनाम स्त्रोत पठण श्री एकवीरा भगिनी मंडळ, सायंकाळी सहा वाजता आर्शिवाचन, श्रीमंत जगतगुरु शंकराचार्य महाराज करवीरपीठ, रात्री नऊ वाजता सुश्राव्य गायन व अभंगवाणी श्री. रोहित पुजारी. शुक्रवारी दोन डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता श्री अक्कामादेवी भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी चार वाजता कृष्णालहीरी स्त्रोत पठण श्री एकवीरा भजनी मंडळ, सायंकाळी सहा वाजता प्रवचन डॉ. शिवयोगी शिवाचार्य म्हैशाळ, सायंकाळी सात वाजता भजन, श्री हरी भजनी मंडळ, रात्री नऊ वाजता अभंगरंग व नाट्यभक्तीरंग श्री. अभिषेक काळे आकाशवाणी, शनिवारी तीन डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता गंगालहीरी स्त्रोत पठण श्री एकवीरा भजनी मंडळ, सायंकाळी सहा वाजता प्रवचन ह.भ.प. दीपक धनाने गाणगापूर, सायंकाळी सात वाजता भजन श्री भाग्यलक्ष्मी भजनी मंडळ, रात्री नऊ वाजता सोंगी भजनाचा बहारदार कार्यक्रम श्री माऊली संगीत सोंगी भजन मंडळ जंगमवाडी, रविवारी 4 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता भजन, श्री सोनामाता भजनी मंडळ, सायंकाळी चार वाजता नर्मदा लहरी स्त्रोत पठण श्री एकविरा भजनी मंडळ, सायंकाळी सहा वाजता प्रवचन ह.भ.प. विष्णुपंत नेमले, सायंकाळी सात वाजता बासरी वादन ओंकार आंबेकर, रात्री नऊ वाजता कीर्तन, मंगलाताई शंकरराव जाधव शिवसंत महिला भजनी मंडळ सांगली, सोमवार पाच डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता भजन, श्री कालिका महिला मंडळ, सायंकाळी चार वाजता स्त्रोत्र पठण श्री एकवीरा भजनी मंडळ, सायंकाळी सहा वाजता प्रवचन ह.भ.प. श्री शंकर मेंगे गुरुजी, सायंकाळी सात वाजता बासरी वादन ओंकार आंबेकर, रात्री नऊ वाजता सुश्राव्य गायन श्री. अजित कडकडे मुंबई, मंगळवारी 6 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता श्री दत्त याग पूजा, सकाळी दहा वाजता श्री पादुका व मूर्तीची भव्य मिरवणूक, रात्री नऊ वाजता भजन श्रीपंत बाल अवधूत भजनी मंडळ, बुधवार सात डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता श्री. दत्त पादुकावर सार्वजनिक अभिषेक, सायंकाळी पाच वाजता भजन श्री दत्त मंदिर भजनी व गुरुमाऊली भजनी मंडळ, सायंकाळी सात वाजता श्री दत्त महाराज जन्म सोहळा, रात्री नऊ वाजता भजन शिरोळ तालुका भजन वेडे ग्रुप मंडळ, गुरुवारी आठ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता भजन श्री दत्त भजनी मंडळ मांगूर, दुपारी बारा वाजता महाप्रसाद. होणार आहे अशी माहिती शतकमहोत्सवी सोहळा समितीच्यावतीने देण्यात आली. यावेळी समितीचे अनेक सभासद कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा