दबाव तंत्राचा वापर आणि बरेच काही...!
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून शिरोळ तालुक्यातील राजकीय वातावरण भलतेच तापले आहे. गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छूकांना नमवन्यासाठी विविध शैली वापरून दबाव आणण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे राजकीय नेत्याच्या मनातला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने इच्छूकांची निराशा झाली आहे.
एखादा अति इच्छूक उमेदवार स्वच्छ मनाने निवडणूक लढवण्यास तयार झाला तर त्याला नमवण्यासाठी वेगवेगळे दबावगट तयार करून थांबण्याचे काम सध्या ग्रामीण भागात सुरू आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा