दत्तवाड येथील महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सव साजरा

 


इसाक नदाफ/ शिवार न्यूज नेटवर्क

दत्तवाड (तालुका शिरोळ) येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. महालक्ष्मी मंदिरात कार्तिक दीपोत्सव भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी देवीला अभिषेक घालून देवीची विधिवत पूजा करण्यात आली. सायंकाळी सात वाजता मंदिर व परिसरात भक्त मंडळ व ग्रामस्थ यांच्यातर्फे दीपोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी देवीची आरती होवून प्रसाद वाटप करून दीपोत्सव संपन्न झाला. यावेळी भाविक, गावातील ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष