शिरोळ तालुक्यातील इच्छूकांना सर्व्हर डाऊनचा फटका
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील १७ 'ग्रामपंचायती निवडणूकीची अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सोमवार पासून सुरू झाली आहे. आज मंगळवारी दिवसभर सर्व्हर डाऊन असल्यामुळे इच्छूक उमेदवारांना नेट कॅफेत दिवसभर ताटकळत उभे रहावे लागले. अर्ज दाखल करण्यासाठी उद्यापासून फक्त तीन दिवस राहिल्याने इच्छूकांची घालमेल वाढल्याचे चित्र शिरोळ तालुक्यातून दिसून येत आहे.
उमेदवारांची कादपत्रे गोळा करून दमछाक झालेल्या कार्यकर्त्यांना ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरताना सर्व्हर डाऊनचा फटका बसत आहे. दिवस दिवस इच्छूक उमेदवारांना सेतू, कॉम्प्यूटर सेंटर्सवर दिवसभर ताटकळ उभारावे लागत आहे. दररोज या अडचणी कायम असताना, दिवसभर सर्व्हर डाउन चा फटका बसला. आतातरी पुढे तिनच दिवस राहिले असल्याने सर्व्हर वर मोठा ताण पडणार आहे. त्यामुळे आजपासून सर्व्हर काम करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा