हेरवाड : वसंतराव देसाई व दिलीप पाटील गट एकत्र


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्याने गावात राजकीय वातावरण तापले आहे. या तापलेल्या वातावरणामध्येच काही नाराज पदाधिकारी सत्ताधारी आणि विरोधी गटात सामील झाले, मात्र वसंतराव देसाई कोणता निर्णय घेतात ? याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. वसंतराव देसाई यांनी दिलीप पाटील यांच्या गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असल्याने सत्ताधारी गटाला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

सलग चार दिवस चाललेल्या बैठकीनंतर वसंतराव देसाई आणि दिलीप पाटील गटाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरपंच आमचाच आणि सर्व सदस्यही आपलेच हा पक्का इरादा करून त्यांनी निवडणूक रिंगणात येवून शड्डू ठोकला आहे. त्यामुळे सत्ताधारी आर.बी. पाटील गट कोणती व्यूव्हरचना आखणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष