हेरवाड ग्रामपंचायत निवडणूक स्वाभिमानी स्वबळावर लढविणार


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

 हेरवाड ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूकीची तारीख जाहीर झाल्यामुळे गावातील स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुका अध्यक्ष बंडू पाटील यांनी दिली.

 मागील पंचवार्षिक निवडणूकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना हेरवाड ग्रामविकास आघाडीबरोबर राहिली होती. मात्र यावेळी स्वभिमानीने स्वतंत्र पॅनेल करुन स्वबळावर लढणार असल्याची माहिती दिल्यामुळे गावात चर्चा रंगली आहे.

हेरवाड ग्रामपंचायतीसाठी लोकनियुक्त सरपंच व सदस्य असे एकुण 16 जणांची संख्या आहे. यावेळी सरपंच पदासाठी  मागासवर्गीय महिला हे आरक्षण पडले आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवार नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे इतरांची मात्र डोकेदुखी वाढणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष