इच्छूक उमेदवारांची पावलं ज्योतिषांकडे

सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

निवडणूक ग्रामपंचायत सदस्यांची असू दे किंवा खासदारकीची, उमेदवारी अर्ज भरताना उमेदवार शुभ-अशुभ दिवस पाहतोच. मात्र चक्क ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी  इच्छुक असलेले उमेदवारही अर्ज भरताना ग्रह-तारे आणि शुभ-अशुभ दिवस कोणता, हे जाणून घेण्यासाठी ज्योतिषांकडे जात असल्याचे चित्र सध्या शिरोळ तालुक्यातून दिसून येत आहे.

शिरोळ तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निवडणूक अर्ज भरण्यासाठी कोणत्या राशीला कोणता दिवस आणि कुठली वेळ शुभ आहे, याचं गणित जुळवण्यात गटनेते आणि उमेदवारांचा वेळ जात आहे.

शुभ दिवसातील कुठल्या वेळी अर्ज भरावा, कुठल्या वेळेत तो निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करावा, अर्ज देताना पूर्वेकडे उभं राहावं की पश्चिमेकडे, इतक्या छोट्या प्रश्नांचा भडिमार होत असल्याचे चित्र शिरोळ तालुक्यातून दिसून येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष