अकिवाटमध्ये इच्छूकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग
अकिवाट / शिवार न्यूज नेटवर्क :
अकिवाट ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीची तारीख जाहीर झाल्यामुळे गावातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सरपंच पद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्याने इच्छूकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून उमेदवार निश्चित करण्याचे काम गावातील राजकीय पुढार्यांच्याकडून सुरु आहे.
मागील पंचवार्षिक निवडणूकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना आणि आवाडे गटाचे याच्या माध्यमातून पॅनेलची निर्मिती करण्यात आली होती. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या माध्यमातून एक पॅनेल तयार करण्यात आले होते. यावेळी जनतेने संघटना, शिवसेना आणि आवाडे गटाच्या पॅनेलला कौल दिला आणि विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीला दोन सदस्यांवर समाधान मानावे लागले. तसेच सरपंच पदासाठी तीन उमेदवारापैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल चौगुले यांना संधी देण्यात आली होती.
यावर्षीही दोन पॅनेलच्या माध्यमातून लढत होणार आहे. सरपंच पद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्याने गावात इच्छूकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून इच्छूक उमेदवरांच्या बैठका घेवून नांवे निश्चित करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु केले आहे. त्यामुळे अकिवाटच्या निवडणूकीत मोठी चुरस पहायला मिळणार आहे.
अतिक्रमणाचा विषय आणि नेत्यांची डोकेदुखी
सध्या अकिवाट ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीची तारीख जाहीर झाली असून यासाठी राजकीय यंत्रणा कामाला लागली असतानाच अतिक्रमणाचा विषय निघाल्याने स्थानिक राजकीय पुढारी आणि नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा