तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे - जाधव यांचा अपघाती मृत्यू

 


हेरले / शिवार न्यूज नेटवर्क :

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे - जाधव यांचा अपघाती मृत्यू झाला. कोल्हापूर - सांगली महामार्गावर हालोंडी फाटा येथे शनिवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. कल्याणी या हालोंडी येथील हाॅटेल प्रेमाची भाकरी येथून मोपेडने कोल्हापूरला जात असताना ट्रॅक्टरने धडक दिली. या धडकेत कल्याणी गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. 

याबाबत मिळालेली माहिती अशी : तुझ्यात जीव रंगला यासह अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेल्या मराठी 

अभिनेत्री कल्याणी अभिजित जाधव यांनी पंधरा दिवसांपूर्वी कोल्हापूर - सांगली महामार्गावर हालोंडी येथील खाऊ गल्लीमध्ये प्रेमाची भाकर या नावाने आपला हाॅटेल व्यवसाय सुरू केला होता. 

अभिनयासोबत स्वतःचा काहीतरी व्यवसाय करुन कल्याणी यांना स्वतःच्या पायावर उभे रहायचे होते. त्यामुळे आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी हॉटेल सुरु केले होते. काल रात्री त्यांनी आई - वडिल आणि मुलाला जेवणासाठी बोलावले होते. वडिल पांडूरंग पुंडलिक कुरळे ( रा. राजापुरी १३ वी गल्ली, कोल्हापूर ) हे रिक्षा व्यवसाय करतात. कल्याणी यांच्या हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर त्यांनी तिच्याशी गप्पा मारत तीला कामातही थोडी मदत केली. 

त्यानंतर रात्रीच्या सुमारास कल्याणी हॉटेल बंद करुन कल्याणी आपल्या मोपेडवरून ( एमएच ०९ एफआर ३३३० ) घरी जाण्यासाठी बाहेर पडल्या. त्यांच्या पाठोपाठ आई - वडील आणि मुलगा हे रिक्षातून निघाले. कोल्हापूर - सांगली मार्गावर कल्याणीच्या हालोंडी फाटा येथे कल्याणी यांच्या मोपेडला मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने ( एमएच ०९ एसी ५९२२ ) धडक दिली. पाठीमागून येणारे आई - वडिल ही दुर्घटना आपल्या डोळ्याने बघत होते. त्यांनी तात्काळ रिक्षा बाजूला घेत रस्त्यावरून जाणाऱ्यांडे मदतीची याचना केली. त्यानंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. 

वडिलांनी याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ट्रॅक्टर चालक महादेव बाबूराव पाटील ( रा. कसबा बीड, ता. करवीर ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील हे पुढील तपास करत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष