अकिवाट मध्ये विशाल चौगुले गट जोरात
अकिवाट / शिवार न्यूज नेटवर्क-
अकिवाट ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे गावात राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी विशाल चौगुले गटाने चांगलीच व्यूहरचना आखली आहे, अशातच अनेक मातब्बर त्यांच्या बरोबर असल्याने विशाल चौगुले यांचा गट अकिवाटमध्ये जोरात आहे.
मागील पंचवार्षिक निवडणूकीमध्ये विशाल चौगुले यांनी ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली होती, आणि स्वतः सरपंच म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर आणि त्यांच्या कारकिर्दित उभी राहिलेली ग्रामपंचायतीची शानदार इमारत तसेच गावातील जनसामान्यांचे लोकमत विशाल चौगुले यांच्या पाठीमागे असल्यामुळे त्यांचे गावात पारडे जड झाले आहे.
यंदा गावात सर्वसाधारण महिला सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे गावात इच्छूकांची संख्या मात्र वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर गावात बैठकांवर मोठा जोर आला असून उमेदवार निश्चित करुन उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. दरम्यान, अकिवाटमध्ये गायरान जमिन मोठया प्रमाणात असल्यामुळे गायरान मधील उमेदवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कायदेतज्ञांचे सल्ले घेत असल्याचे चित्र सध्या गावात दिसून येत असून राजकीय वातावरण तापले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा