घोडावत विद्यापीठात परदेशी शिक्षण मेळ्याचे आयोजन

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

विद्यार्थ्यांना परदेशी जाऊन शिक्षण घेणे सोपे व्हावे व त्यासंबंधीची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी या हेतूने आज 26 नोव्हेंबर रोजी संजय घोडावत विद्यापीठ आणि के सी ओवर्सेस एज्युकेशन अँड एज्युलन्स एज्युकेशनल कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने घोडावत विद्यापीठात परदेशी शिक्षण मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

           पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासंबंधीचे माहितीपत्रक येथे उपलब्ध होणार आहे. प्रवेश प्रक्रिये संबंधी माहिती देण्यासाठी या मेळ्यामध्ये दहा परदेशी विद्यापीठांचा समावेश असणार आहे. यामध्ये कार्डीफ मेट्रोपॉलिटीन युनिव्हर्सिटी युके, अंगीला रशियन यूनिवर्सिटी युके, युनिव्हर्सिटी ऑफ चेस्टर युके, न्यूमा बिझनेस स्कूल फ्रान्स, युनिव्हर्सिटी ऑफ युरोप फॉर अप्लाइड सायन्सेस जर्मनी, युनिव्हर्सिटी ऑफ न्यू कॅस्टल ऑस्ट्रेलिया, माणितोबा इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेडस अँड टेक्नॉलॉजी कॅनडा अशा परदेशी विद्यापीठांचा यामध्ये समावेश असणार आहे. त्याचबरोबर काही बँका देखील परदेशी शिक्षणासाठी लागणाऱ्या कर्जा संबंधी माहिती देणार आहेत.

या मेळ्यास भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना माहितीपत्रक प्रवेश अर्ज याची माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्या संबंधीचे करार इथे करून घेतले जातील. हा मेळा सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे. या मेळ्याचे उद्घाटन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता. होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच परदेशी शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठ्या स्वरूपात परदेशी शिक्षण मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यात सर्व विद्यार्थी- पालकांनी माहिती घेऊन परदेशी शिक्षणाचे आपले स्वप्न पूर्ण करावे आणि जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा.

- कुलगुरू डॉ.अरुण पाटील

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष