रेडेकर कॉलेजच्या मुजफ्फर मुल्ला यांची निवड

 


गडहिंग्लज / शिवार न्यूज नेटवर्क :

गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाचे खो-खो खेळाडू मुजफ्फर मुल्ला व बास्केटबॉलचा खेळाडू गोपाळ सरवळे या विद्यार्थ्यांची औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवातील स्पर्धेसाठी विद्यापीठ संघातून निवड झाली आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील खेळाडूंची विभागीयनिवड चाचणी स्पर्धा नाशिकमध्ये झाली. या स्पर्धेतून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा संघ निवडला गेला. त्यात मुल्ला याची खोखो संघात तर सरवळे याची बास्केट बॉल क्रीडा प्रकारात विद्यापीठ संघात निवड झाली. औरंगाबाद येथे ३ ते ७ डिसेंबरपर्यंत या स्पर्धा होणार आहेत. निवडीनंतर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अंजना रेडेकर, उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, सचिव सुनिल शिंत्रे, प्राचार्य डॉ. विणा कंठी, उपप्राचार्य डॉ. पंकज विश्वकर्मा यांनी या विद्यार्थ्यांचा गौरव केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष