बुबनाळ येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
बुबनाळ ( ता. शिरोळ) येथील राजश्री दिपक कबाडे ( वय : २८) या विवाहित महिलेने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याबाबतची वर्दी पती दिपक मायाप्पा कबाडे यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, बुबनाळ येथे कबाडे कुटुंबिय वास्तव्यास आहे. या कुटूंबातील राजश्री कबाडे या महिलेने नैराश्यपोटी घरातील बेडरुम मधील स्लॅबच्या छताच्या हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी भेट देवून घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा