वसंतराव देसाई यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्याने गावातील राजकीय व्यक्ती आणि आघाड्यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. एकेकाळी गावची सत्ता पाहलेल्या आणि विकास कामांच्या जोरावर अजूनही प्रत्येक ग्रामस्थांच्या मनात घर करून राहिलेले माजी सरपंच वसंतराव देसाई त्यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीत आर. बी. पाटील गट व दिलीप पाटील या दोन बलाढ्य गटाचेही लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लागून राहिल्याने वसंतराव देसाई कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून राहिले आहे.
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. पॅनलच्या माध्यमातून कोणाला उमेदवारी द्यायची यासाठी बैठकांच्या फेऱ्या रंगत आहेत. सध्या गावात पॅनल ची संख्या ही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी सरपंच वसंतराव देसाई हे पॅनेल लावणार का ? की कोणत्या पॅनलल सहकार्य करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा