दत्तवाड येथे कै. शामराव पाटील- यड्रावकर यांची जयंती साजरी
इसाक नदाफ/ शिवार न्यूज नेटवर्क
सहकार औद्योगिक क्षेत्रातील महामेरू, सहकार क्षेत्रातील महासम्राट, जनसामान्यांचा आधारवड म्हणून ज्याची अखिल महाराष्ट्रात ख्याती म्हणून राहिलेली आहे असे कै. शामराव पाटील- यड्रावकर यांची ८८ वी जयंती आज दत्तवाड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
येथे सकाळी कै. शामराव पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेस डी. एन. सिदनाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कै. शामराव पाटील- यड्रावकर हे सर्वसामान्य जनतेचे नेते होते. त्यांनी या जनसामान्य जनतेच्या जीवनात समृद्धी नांदावी त्यांचे संसार सुखामध्ये जास्तीत जास्त समृद्धी यावी म्हणून सहकारी औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून अपार कष्ट केले आहेत. त्यामुळे ते जनसामान्यांच्या हृदयात अजरामर होऊन राहिलेले आहेत.
यावेळी अभय चौगुले, राजेंद्र चौगुले, प्रकाश चौगुले, प्रभू चौगुले, श्रीपाल धोतत्रे, वर्धमान नेजे, राहुल माळगे, दादासो कांबळे, नूर काले, सचिन सिदनाळे, राहुल चौगुले त्याचबरोबर यड्रावकर ग्रुप चे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा