श्री क्षेत्र नृसिंहवाडीत बुडणार्‍या बाप-लेकाला मिळाले जीवदान

वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी वाचविले जीव


नृसिंहवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील नदीपात्रात बुडणार्‍या दोन भाविकांना वाचविण्यात वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांना यश आले आहे.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कर्नाटक राज्यातील हुबळी येथील संजय कदम व त्यांचा मुलगा सागर कदम दत्त दर्शनास आले होते. दर्शनाअगोदर कृष्णा नदीत अंघोळीसाठी ते गेले होते, यावेळी नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे नदीत बुडू लागले. यावेळी तिथे असलेले वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान शिवा सोनार यांनी तात्काळ नदीत उडी मारुन बुडणार्‍या बाप-लेकाचा जीव वाचविला. यावेळी अमोल निकम, प्रवीण कांबळे यांनीही बुडणार्‍या दोघांना वर काढण्यास मदत केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष