भारत जोडो यात्रेसाठी शिरोळ तालुक्यातून काँग्रेसचे पदाधिकारी हिंगोलीला रवाना
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो या यात्रेसाठी आमचे नेते कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि माजी मंत्री माननीय आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली ,शिरोळ तालुका काँग्रेसचे नेते आणि श्री. दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत आदरणीय गणपतराव दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ,शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्री. सर्जेराव शिंदे, काँग्रेसचे समन्वयक मा. श्री. शेखर पाटील, जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन बागी, शिरोळ तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष अमोल चौगुले, शिरोळ तालुका महिला राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा आणि शिरोळ तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.मिनाज युनुसअल्ली जमादार आणि शिरोळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष वसीम रमीजराजा जमादार या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज शिरोळ तालुक्यातील शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते उद्या होणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील रँलीमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेण्यासाठी रवाना झाले.यावेळी आदरणीय गणपतराव दादानीं श्रीफळ वाढवून सर्वांना आशीर्वाद दिले.
यावेळी दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील आणि प्रामुख्याने हेरवाड गावातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नरसगोंडा पाटील, सतिश मगदूम, रघुनाथ पुजारी, हयातचाँद जमादार, सुधीर माळी, आनंदा बरगाले, जमीर मुल्ला, दस्तगीर जमादार, रफीक जमादार, अरूण पाटील हेरवाड,अकबर जमादार, मधुकर सन्नके, मोहन बरगाले,श्रेणीक ढोणे, प्रवीण पाटील, अरूण पाटील घोसरवाड, चंद्रकांत बिरणगे, कुमार हेरवाडे दत्तवाड, मुस्ताफ नदाफ आणि युनुसअल्ली जमादार हे सर्व जण हिंगोलीला रवाना झाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा