प्रभाग २ साठी उमेदवारांची शोधाशोध
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सर्वच आघाड्यांच्या माध्यमातून तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक दोनसाठी सर्वसामान्य पुरुष, मागासवर्गीय महिला आणि विशेष मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण पडले आहे. मात्र, प्रभाग २ मध्ये अनुसुचित जाती स्त्री व अनुसुचित जमाती स्त्री यासाठी एकही उमेदवार नसल्याने या प्रभागात आघाड्यांना दुसऱ्या प्रभागातील उमेदवार उभा करावा लागणार असल्याने गावात अशा उमेदवारांची शोधाशोध सुरु आहे.
हेरवाड ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सध्या गावात हालचाली गतिमान झाल्या असून कोण - कोणाबरोबर जाणार ? आणि किती आघाड्या होणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
प्रभाग क्रमांक २ मधील आरक्षणामुळे सर्वच आघाडी प्रमुखांची डोकेदुखी वाढली असल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रभागामध्ये बौध्द, चर्मकार समाजाचे एकही घर नसल्याने या ठिकाणी इतर प्रभागात राहणारा उमेदवार शोधावा लागत आहे. तर कोळी समाजाचीही हिच स्थिती आहे. या प्रभागासाठी दुसऱ्या प्रभागात राहणारा उमेदवार उभा करावा लागणार आहे. त्यामुळे गावातील आघाड्या सध्या उमेदवार शोधण्याच्या कामात गुंतून असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा