अॅड. अतुल चौगुले यांची नाराजी कोणाला भोवणार ?
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
गावातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी केलेला प्रयत्न, बंद असलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उपोषणाच्या माध्यमातून सुरू करून ग्रामस्थांच्या समस्या सोडवून गावातील जनमानसात आदरभाव राखणारे अॅड अतुल चौगुले हे सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक कोणती भूमिका घेणार ? आणि त्यांची नाराजी कोणाला भोवणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक माझ्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप खुद्द चौगुले यांनी केला असून ते विरोधी गटात सामील होण्याच्या तयारीत असल्याचे समजते. असे झाले तर सत्ताधारी गटाला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे.
अॅड. अतुल चौगुले यांनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आघाडी प्रमुखांची भूमिका पार पडली होती. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. चौगुले यांचा जुना गट असल्याने त्यांनी सातत्याने ग्रामपंचायत पंचायत समिती आदी निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असल्याने गावाबरोबर बाहेर गावातील लोकमत त्यांच्या मागे आहे. त्यामुळे अतुल चौगुले कोणता निर्णय घेतात ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा