वेटलिफ्टिंग स्पर्धेत भूमिका मोहितेला सुवर्ण पदक
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
जळगांव येथे झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत हेरवाडची कन्या भूमिका राजेंद्र मोहिते हिने सुवर्ण पदक पटकावून प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे.
जळगांव येथे महाराष्ट्र स्टेट वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत राज्यभरातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत भूमिका राजेंद्र मोहिते हिने सुवर्ण पदक पटकावून यश संपादन केले आहे. या यशाबद्दल हेरवाड सह परिसरात तिचे कौतुक होत आहे. भूमिका हिने राज्यस्तरीय स्पर्धेबरोबर आंतराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा