अंगणवाडी सेविका व मदतनीस आपल्या प्रलंबित मागण्यासाठी 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाणार
सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
-- राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासनाने 26 जानेवारीपर्यंत समाधानकारक मानधन वाढ व जुने खराब व नादुरुस्त मोबाईल परत घेऊन नवीन मोबाईल देण्यात येईल, व पोषण ट्रेकर एप मराठीत करण्याबद्दल मा.उच्च न्यायालयातील केसच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे मान्य केले होते .
याबाबतीत 12 जानेवारी रोजी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे सह महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र आजतागायत याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही याचे निषेधार्थ राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस. 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाणार आहेत याबाबतीत सर्व जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने मोर्चाने निवेदन देणार आहोत तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन च्या वतीने जिल्हा अध्यक्ष कॉ आप्पा पाटील व सरचिटणीस कॉम्रेड जयश्री पाटील यानी दिला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा