हेरवाडध्ये 25 रुपयात मिळणार रुग्णांना इंजेक्शन
गांवसभेत ठराव मंजूर, विधवा महिलांच्या पेन्शनसाठी गांव एकवटले
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथील ग्रामपंचायतीची नूतन गांवकारभार्यांच्या उपस्थितीत पहिली गांवसभा संपन्न झाली, यामध्ये रुग्णांना 25 ते 30 रुपयांत इंजेक्शन तसेच विधवा महिलांना सरकारकडून पेन्शन मिळावी, यासह विविध विषयांवर सभा संपन्न झाली, सभेतील एकुण 14 विषयांना ग्रामंस्थांनी एकमताने मंजूरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी नूतन सरपंच रेखा जाधव होत्या.
प्रारंभी ग्रामविकास अधिकारी पी.आर.कोळेकर यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले, यावेळी शासनाच्या विविध परिपत्रकाचे वाचन करण्यात आले. माझी वसुंधरा अभियान राबविणेबाबत चर्चा करण्यात आली. हेरवाड येथील मिळकतींची सन 2023-24 ते 2027-28 करांची फेरआकारणीबाबत चर्चा करण्यात आली. सन 2023 24 चा थिमॅटिक आराखडा तयार करण्यासाठी विषय मांडण्यात आला. मनरेगा योजनेबाबत चर्चा करणे व शासकीय योजनांचे सामाजिक अंकेक्षण करणे, शासकीय योजनेंचे लाभार्थी निवडणेबाबत, साथ रोग निवारणार्थ प्रतिबंधात्मक उपाययोजना, गायरान जागेतील अतिक्रमणाबाबत, पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी व इतर योजनेसाठी गायरान मध्ये जागा आरक्षित करणेबाबत, विविध विभागाकडील योजनांचा आढावा घेणे, शासकीय योजनेतून चर्मकार समाजासाठी सांस्कृतिक हॉल इमारत निधीची मागणी करणे. जलजीवन मिशन बाबत चर्चा करणे, श्री. मारुती देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती नियुक्ती करणेबाबत चर्चा करण्यात आली.
आयत्या वेळच्या विषयामध्ये गावातील कोणताही नागरीक औषधोपचारापासून वंचित राहू नये, या करिता गावातील आरोग्य केेंद्रामध्ये 25 ते 30 रुपये या अल्पदरात इंजेक्शन व सलाईनची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. याचबरोबर विधवा महिलांच्यासाठी राज्य शासनाकडे मागणी करुन त्यांना पेन्शन सुरु करण्यात यावी, याचाही ठराव यावेळी करण्यात आला.
या गांवसभेत उपसरपंच सचिन पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदाधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, तरुण मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
-------------------------------------
तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी दोन अर्ज
संपूर्ण गांवचे लक्ष लागून राहिलेल्या तंटामुक्त अध्यक्ष निवडीसाठी ग्रामपंचायतीकडे दोन अर्ज दाखल करण्यात आले होते, यापैकी एक गिरीष पाटील व संजय कांबळे या दोन व्यक्तींनी अर्ज दाखल केला होता, या विषयावर चर्चा करण्यात आली, येत्या 2 ऑक्टोंबरच्या गांवसभेत तंटामुक्त अध्यक्ष निवडीचा विषय घेण्याचे ठरले.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा