कल्पद्रुम आराधना महोत्सवात गुरुवारी हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी तर शुक्रवारी रथोत्सव

 महामहोत्सव समिती अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली माहिती



जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

येथील श्री 1008 दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट जयसिंगपूर व कल्पद्रुम आराधना महामंडळ महामहोत्सव समिती यांच्यावतीने सुरू असलेल्या महामंडळ विधान महोत्सवा अंतर्गत गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी हेलिकॉप्टर मधून भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर वरती पुष्पव्रूष्टी करण्यात येणार असून यासाठी हेलिकॉप्टरची सवाल बोली मंगळवार दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी दुपारी तीन वाजता धर्मसभा मंडपात आयोजित केली आहे,

तसेच महामहोत्सवाच्या अंतिम दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी भव्य रथोत्सवाचे आयोजन केले असून या रथोत्सवासाठी सवाल बोली एक फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी तीन वाजता धर्मसभा मंडपात होणार असल्याची माहिती श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व कल्पदृम आराधना महामहोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे, हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यासाठी लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलच्या पटांगणामध्ये हेलीपॅडची उभारणी केली असून या ठिकाणाहून हेलिकॉप्टर चे उड्डाण होणार आहे, तसेच अंतिम दिवशी होणारा रथोत्सव नेत्रदीपक रोषणाई व विविध वाजंत्री पथकांच्या सहभागाने भव्य आणि दिव्य असा होणार आहे, रथोत्सवामध्ये एका चांदीच्या रथासह सात रथ, दोन हत्ती व २१ घोडी यांचा समावेश असणार असल्याची माहिती देताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन पुण्यप्राप्ती करून घ्यावी असे आवहान केले आहे. यावेळी मंदिर ट्रस्टी व महामहोत्सव समितीचे सदस्य वीर सेवा दलाचे सदस्य व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष