बेडकिहाळ येथील संकेत शिंगाडे व अभिनंदन शिंगाडे यांचे अभ्यांग क्लासेस मध्ये यश
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
अभ्यांग क्लास अल्फान्सो स्कूल यड्राव -इचलकरंजी येथे पाच हजार विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यामध्ये डॉ. विक्रम शिंगाडे व सौ.भारती शिंगाडे यांचे चिरंजीव संकेत शिंगाडे व अभिनंदन शिंगाडे यांचा तीन राज्यात द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल अभ्यांग क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडेल देऊन सत्कार करण्यात आले.
संकेत व अभिनंदन शिंगाडे याना चौगुले मॅडम या अभ्याग क्लासेसच्या प्रमुख मार्गदर्शिका , दिपा जालीहाळ यांचे देखील सहकार्य लाभले. सदलगा CBSC इंग्लिश मिडीयम स्कूल सदलगा येथे संकेत शिंगाडे आठवीत तर अभिनंदन शिंगाडे सहावीत शिकत असुन 26 जानेवारी दिवशी घेण्यात आलेली अभ्यांग क्लास परीक्षांमध्ये तीन राज्यात द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल शाळेचे चेअरमन श्री. प्रकाश जनगौंडा पाटील व प्रिंसिपल सय्यद सर तसेच सर्व मान्यवर व शिक्षक व शिक्षीका स्टाफ यांच्या शुभहस्ते आदर्श विद्यार्थी सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक गौरव करुन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आले. त्यावेळी शाळेचे संचालक अशोक उगारे, रमेश माने,शरद लडगे,भरत पाटील, शितल प्रधाने, संजय कोरे, ज्योती चिंचणीकर, पुजा पाटील तसेच सर्व मान्यवर व शिक्षक स्टाफ उपस्थित होते. तीन राज्यात द्वितीय क्रमांक आल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा