जैन धर्माची शिकवण जगाला प्रेरणा देणारी : पालकमंत्री दीपक केसरकर
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील 1008 पार्श्वनाथ दिगंबर मंदिर ट्रस्ट व श्री कल्पद्रुम आराधना महामंडळ महोत्सव समितीच्या वतीने आयोजित श्री कल्पद्रूम आराधना महामंडळ विधान महोत्सवास गुरुवारी आनंदी आणि मंगलमय वातावरणात असंख्य श्रावक श्राविकांच्या अमाप उत्साहात धार्मिक विधीने सुरुवात झाली, दरम्यान महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महोत्सवास सदिच्छा भेट दिली मुनी श्रींचे शुभाशिर्वाद घेतले, यावेळी शुभेच्छा देताना पालकमंत्री म्हणाले की जैन समाज बांधव कष्टाळू आहेत शेतीबरोबरच व्यापार आणि उद्योग व्यवसायामध्ये देशभरात या समाजाने स्वतःच्या कर्तुत्वाने वेगळी ओळख निर्माण केली आहे, जगा व जगू द्या ही जैन धर्माची शिकवण जगाला प्रेरणा देणारी आहे, भगवान तिर्थंकर महावीरानी जैन धर्माचा प्रसार व प्रचार केला असे सांगताना मुनिजनांच्या चरणी मी वंदन करीत असल्याचे सांगितले, शिरोळचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी जो निधी मागतील तो आपण देऊ असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी देखील यावेळी श्रावक श्राविकांना शुभेच्छा दिल्या, श्री १००८ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मंत्री दीपक केसरकर, आमदार हसन मुश्रीफ आणि खासदार धैर्यशील माने यांच्या सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला, संजय पाटील यड्रावकर, रवींद्र माने, सतीश मलमे, शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते,
गुरुवारी सकाळी मंगलनाद होऊन सौधर्म इंद्र इंद्रायणी प्रकाश मगदूम व सौ. भारती मगदूम चक्रवर्ती, मुख्य चक्रवर्ती प्रदीप ऊरसुट्टे, सौ सुनीता ऊरसुट्टे यांचे आगमन झाले, त्यानंतर आचार्य यांना निमंत्रित करून कंकण बंधन सोहळा संपन्न झाला, सौधर्म इंद्र इंद्रायणी व मुख्य चक्रवती यांचे मिरवणुकीने धर्मसभा मंडपापर्यंत आगमन झाले, सभामंडपा समोरील ध्वजाचे आदित्य पाटील यड्रावकर व सौ. स्फूर्ती आदित्य पाटील यड्रावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तसेच धर्मसभा मंडपाचे उदघाटन बी.ए. शिखरे, सौ शिखरे, सुचित शिखरे व पद्मिनी शिखरे यांच्या हस्ते करण्यात आले, मंडप शुद्धीकरण करून जलकुंभ मिरवणुकीने सभामंडपात आणण्यात आला, मानस्तंभ स्थापना भगवंतांचा अभिषेक महोत्सव अंतर्गत नित्य मांगलिक कार्य करण्यात आले,दुपारी सौधर्म इंद्र इंद्रायणी यांच्या हस्ते मंदिरा समोरील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले, दुपारच्या सत्रात मुनीश्रींचे मुनी संघासह धर्मसभा मंडपात आगमन झाले,यावेळी परमपूज्य 108 आचार्य श्री वर्धमानसागरजी महाराज यांचे मंगल प्रवचन झाले,मनुष्याने कोणतेही कार्य निरपेक्ष पणाने करावे, पाप मुक्ती मिळण्यासाठी पश्चाताप केला पाहिजे, जगामध्ये अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारा जैन धर्म श्रेष्ठ आहे असे मौलिक मार्गदर्शन त्यांनी केले, यावेळी परमपूज्य १०८ श्री वर्धमान सागरजी महाराज, परमपूज्य 108 आचार्य श्री चंद्रप्रभू सागरजी महाराज, परमपूज्य 108 निर्णापकश्रमण धर्मसागरजी महाराज, निर्यापकश्रमण श्री. विद्यासागरजी महाराज, निर्यापकश्रमण सिद्धांत सागरजी महाराज, यांच्यासह मुनी संघ अष्ट कुमारी, पंचकुमार,उपस्थित होते, कुबेरद्वारा रत्नवृष्टी दिग्विजय यात्रा, सायंकाळी सवाल आरती सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले, नाट्य शुभांगी जयसिंगपूर निर्मित भरत बाहुबली या नाटकाचे सादरीकरण झाले, या महोत्सवासाठी प्रतिष्ठा आचार्य संदेश उपाध्ये नेज, स्थानिक पंडित सुभाष उपाध्ये, संगीतकार सचिन चौगुले उदगांव, काम पाहत आहेत दिवसभर झालेल्या सोहळ्यात मंदिर व ट्रस्टी समितीचे पदाधिकारी, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, जैन महिला परिषद, जैन युवा मंच जयसिंगपूर चे पदाधिकारी श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा