कोणतेही काम श्रद्धेने करावे : १०८ निर्यापकश्रमण धर्म सागरजी महाराज
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
कोणतेही काम श्रद्धेने करावे मग ते काम छोटे असो अथवा मोठे ज्या कामांमध्ये श्रद्धा असते त्याच कामाचे सार्थक होते असे मौलिक मार्गदर्शन १०८ निर्यापकश्रवण धर्म सागरजी महाराज यांनी केले, जयसिंगपूर येथे सुरू असलेल्या कल्पद्रुम आराधना महामहोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हजारो श्रावक श्राविकांनी महोत्सवाला भेट देऊन धार्मिक उत्सवात सहभाग नोंदवला,
येथील 1008 पार्श्वनाथ दिगंबर मंदिर ट्रस्ट व श्रीकल्पद्रुम आराधना महामंडळ विधान महोत्सवात शुक्रवारी धर्मसभामंडपातील समवशरण नमोकार मंत्राच्या उच्चारात अहिंसा परमो धर्म, विश्वशांती की जय या जयकारात गर्भसंस्कार विधी करण्यात आले, शुक्रवारी सकाळी पहाटे मंगलनाद होऊन धार्मिक विधीना सुरुवात झाली, सौधर्म इंद्र इंद्रायणी व मुख्य चक्रवर्ती यांचे सभा मंडपापर्यंत आगमन झाले, जलकुंभ मिरवणुकीने आणण्यात आला, कल्पद्रुम आराधना अंतर्गत सकाळच्या सत्रात बीजाक्षर भगवंतावर पंचामृत अभिषेक शांतीधारा असे मांगलिक विधी संपन्न झाले, त्यानंतर समवशरण समोर गर्भसंस्कार विधीस सुरुवात झाली यावेळी प्रतिष्ठाचार्य संदेश उपाध्ये यांनी नमोकार मंत्राच्या उच्चारात मंगलमय आणि धार्मिक वातावरणात संस्कार केले, दुपारच्या सत्रात महोत्सव समितीच्या वतीने त्यागीना सहवाद्य मिरवणुकीने सभामंडपात आणले,यावेळी परमपूज्य 108 धर्मसागरजी महाराज यांचे मंगल प्रवचन झाले ते म्हणाले मनुष्य कोणतेही काम किती मोठ्या प्रमाणात करतो यापेक्षा त्या कामांमध्ये श्रद्धा किती असते यावरच कार्याचे महत्त्व अवलंबून आहे, मनुष्याने संसारिक जीवन जगताना भगवंतावर श्रद्धा ठेवली पाहिजे, चांगले आचरण,चांगली नीतिमत्ता आणि धर्माची नाडी धरली तर संसाराचा प्रवास यशस्वी आणि सुखाचा होतो, असे मौलिक मार्गदर्शन करून श्रावक श्राविकांना मंत्रमुग्ध केले,यावेळी चक्रवर्ती चंद्रप्रभू सागरजी महाराज म्हणाले जैन शास्त्रामध्ये धर्म, अर्थ,काम,मोक्ष असे चार पुरुषार्थ आहेत,मनुष्याने थोडा वेळ धर्मकार्यासाठी दिला पाहिजे,भगवंताची आणि गुरुची सेवा केल्यास सद्गुणांची प्राप्ती होते, जीवन हे गणित आहे शेवटी उत्तर शांती आणि समाधान हेच असते, जीवनामध्ये सदगुणाची बेरीज आणि दुर्गनाची वजाबाकी केली पाहिजे, पूर्वी पैसा कमी असूनही मनुष्य आपल्या कर्तव्याचे पालन करीत होता त्यामुळे धर्म आणि देश सुरक्षित होता असे सांगून सन 2005 मध्ये सांगली कोल्हापूर सातारा आणि बेळगाव भागातील जैन समाजावर व इतर सर्व समाज बांधवांवर मोठे संकट ओढावले होते त्यावेळी शिरोळचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर हे खंबीरपणे सर्वांच्या पाठीशी राहून संकटाचा मुकाबला केला होता,त्यावेळी त्यांनी कर्तव्याचे पालन करीत संकटकाळी समाजाला साथ दिली,त्याची प्रचिती म्हणून जनतेने त्यांना आमदार म्हणून लोकप्रतिनिधी होण्याची संधी दिली ज्या मनुष्याच्या हातून कर्तव्याचे पालन होते तोच धर्म पुढे वाचवू शकतो असेही शेवटी ते म्हणाले, यावेळी सर्व मुनी संघ उपस्थित होते, त्यानंतर कुबेराद्वारे रत्नवृष्टी दिग्विजय यात्रा संपन्न होऊन सायंकाळी अष्ट कुमारी व पंचकुमार यांच्या उपस्थितीत होम हवनविधी संपन्न झाला,रात्री जाप्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला, दिवसभर झालेल्या कार्यक्रम प्रसंगी महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह ट्रस्टी महोत्सव समितीचे पदाधिकारी वीर सेवा दल वीर महिला मंडळ जैन महिला परिषद जैन युवा मंच जयसिंगपूर यांचे पदाधिकारी श्रावक श्राविका उपस्थित होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा